बंगळुरुने दिल्लीला नमविले   

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध  दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात बंगळुरुच्या संघाने 6 फलंदाज राखून दिल्लीला नमविले. बंगळुरुचा हा  मागील 10 सामन्यातील 7 वा विजय ठरला.
 
या सामन्याआधी बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 162 धावा केल्या. यावेळी 8 फलंदाज गमावले. या सामन्यात बंगळुरुच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. हेझलवूड याने 2 बळी तर भुवनेश्‍वरकुमार याने 3 फलंदाज बाद केले. यश दयाल आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला. 
 
तर बंगळुरुच्या फलंदाजांपैकी सलामीवीर जेकॅब बेथल याने 12 धावा केल्या. आणि तो अक्सर पटेलच्या गोलंदाजीवर करुण नायरकडे झेलबाद झाला. तर विराट कोहली याने 51 धावा केल्या. आणि शानदार अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरुला सामना जिंकून दिला. तर देवदत्त पड्डीकल हा शून्यावर बाद झाला. अक्सर पटेल याने त्याचा त्रिफळा उडविला. रजत पाटीदार याने 6 धावा केल्या. रजत पाटीदार धावबाद झाला. कृणाल पांड्या याने नाबाद 73 धावा करत शानदार अर्धशतक बंगळुरुच्या खात्यात जमा करत सामना जिंकविला. त्याला साथ देणार्‍या टिम डेविड याने नाबाद 19 धावा केल्या. तर अवांतर 4 धावा संघाला मिळाल्या. 
 
त्याआधी दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 162 धावा केल्या. यावेळी अभिषेक पोरेल याने 28 धावा केल्या. तर प्लेसीस याने 22 धावा केल्या. करूण नायर याला 4 धावांवर असताना यश दयाल याने भुवनेश्‍वरकुमार याच्याकडे झेलबाद केले. लोकेश राहुल याने 41 धावा केल्या. मात्र भुवनेश्‍वरकुमार याने जेक़ोब बेथल याच्याकडे त्याला झेलबाद केले. अक्सर पटेल हा 15 धावांवर हेझलवूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. स्टब्ज याने 34 धावा केल्या. तर अशुतोष शर्मा 2 धावांवर बाद झाला. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
बंगळुरु : कोहली 51, बेथल 12, कृणाल पांड्या नाबाद 73, टिम डेविड नाबाद 19, रजत पाटीदार 6, पड्डीकल 0 एकूण 18.3 षटकांत 165/4
दिल्ली कॅपिटल्स : अभिषेक पोरेल 28, प्लेसीस 22, करुण नायर 4, लोकेश राहुल 41, अक्सर पटेल 15, स्ट्ब्ज 34, विपराज निगम 12, स्टार्क 0, चामरा 0 एकूण 20 षटकांत 162/8  
 

Related Articles